Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!
Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

हायलाइट्स:
- शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट
- उन्हाळ्याच्या सुट्टीतले वोकेशनल कोर्स
- सुट्टीमध्ये चांगली कमाई करण्याची संधी
सर्वप्रथम आपण व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे काय आणि तो का करावा? याबद्दल माहिती घेऊया. जो अभ्यासक्रम केल्यावर थेट नोकरी मिळते, अशांना व्यावसायिक म्हणतात. त्याला जॉब ओरिएंटेड अर्थात जॉब ओरिएंटेड कोर्सही म्हणता येईल. हे अभ्यासक्रम दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सुरू करता येतात. या अभ्यासक्रमांचा कालावधी १ ते २ वर्षांचा असतो. आणि यानंतर तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते.
इंटिरियर डिझायनिंग
इंटिरियर डिझायनिंग हा एक कमी कालावधीचा अभ्यासक्रम आहे. तुम्ही हा कोर्स कधीही करू शकता. हा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी स्वत:चा व्यवसायही सुरू करू शकतात. यासोबतच विद्यार्थ्यांना नोकरीचा पर्यायही उपलब्ध होतात. या क्षेत्रात खूप चांगला पैसा कमाविण्याची संधी आहे.अॅनिमेशन डिझायनिंग
अॅनिमेशन डिझायनिंगचा कोर्स दहावी नंतरही करता येतो. गेमिंग आणि अॅनिमेशनची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करणे योग्य ठरते. या क्षेत्रात टेक्निकल लोकांना खूप मागणी आहे.फिटनेस कोर्स
हा कोर्स करुन तुम्ही स्वतःसोबत इतरांना फिट ठेवू शकता. अनेक सेलिब्रिटींना वैयक्तिक आहारतज्ज्ञाची गरज असते. ते त्यांना भरघोस पगार देण्यासही तयार असतात.
परदेशी भाषा अभ्यासक्रम
परदेशी भाषा अभ्यासक्रम तुम्हाला देशात तसेच परदेशात नोकरीच्या संधी देतो. हा कोर्स करणाऱ्यांसाठी सरकारी पदांवरही भरती निघते.ज्वेलरी डिझायनिंग कोर्स
ज्वेलरी डिझायनिंग कोर्स करून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. यासोबतच चांगले पगार असलेले खासगी नोकरही सहज उपलब्ध आहेत.SPPU VC: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण?

SPPU VC: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोण विराजमान होणार? याची चर्चा सुरु आहे. डॉ. संजीव सोनवणे, डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. विजय खरे, डॉ. अंजली कुरणे, डॉ. संजय ढोले, डॉ. विलास खरात, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. अविनाश कुंभार, डॉ. राजेश गच्छे यांच्यासह १६ उमेदवारांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याची जोरदार चर्चा आहे.
हायलाइट्स:
- पुणे विद्यापीठाला मिळणार नवे कुलगुरू
- १००च्या जवळपास प्राध्यापकांचे अर्ज
- विविध माध्यमातून फिल्डिंग लावायला सुरुवात
शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आपली निवड व्हावी, यासाठी देशभरातील साधारण १००च्या जवळपास प्राध्यापकांनी निवड समितीकडे अर्ज केले आहेत. यातून विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातून अर्ज केलेल्या प्राध्यापकांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, यासाठी आतुर झालेल्या काहींनी ‘राजकारण’ आणि ‘समाजकारणा’च्या माध्यमातून फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर १८ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रभारी कुलगुरूपदाची धुरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, तर प्र-कुलगुरू म्हणून डॉ. संजीव सोनवणे सांभाळत आहे. यापूर्वी, स्थापन करण्यात आलेल्या कुलगुरू निवड समितीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) प्रतिनिधीचा समावेश नसल्याने, ती रद्द करण्यात आली होती. त्यामुळे काही काळ समिती नव्हती. त्यानंतर ‘नॅक’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत डॉ. अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर; तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर यांचा समावेश आहे.
या समितीने ३० मार्चपर्यंत इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार देशभरातून साधारण १००च्या आसपास प्राध्यापकांनी अर्ज केल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातून किमान दहा प्राध्यापकांनी अर्ज केल्याची माहिती पुढे येत आहे.
पुढील पंधरा दिवसांत आलेल्या अर्जांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर पात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात येईल. या यादीतून निवडलेल्या अर्जांवर चर्चा करून, त्यांच्या मुलाखती होतील. यातून निवडलेल्या पाच नावांमधून राज्यपाल कार्यालयाकडून एका व्यक्तीची कुलगुरू म्हणून निवड जाहीर करण्यात येईल. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला किमान एका महिन्याचा कालावधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुलगुरुंची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे.
यांच्या अर्जाची चर्चा...
डॉ. संजीव सोनवणे, डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. विजय खरे, डॉ. अंजली कुरणे, डॉ. संजय ढोले, डॉ. विलास खरात, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. अविनाश कुंभार, डॉ. राजेश गच्छे यांच्यासह १६ उमेदवारांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याची जोरदार चर्चा आहे. या व्यतिरिक्त जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापकांसोबतच राज्यातील विविध विद्यापीठांमधील चर्चेतील प्राध्यापकांनी अर्ज केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीला आधीच भरपूर उशीर झाल्याने, गरजेचे शैक्षणिक निर्णय होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यपाल कार्यालयाने महाराष्ट्र दिनी कुलगुरुंचे नाव घोषित केल्यास योग्य ठरेल. ही डेडलाइन पाळली जाणार नसेल, तर डॉ. नितीन करमळकर निवृत्त होण्याला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळायलाच हवे.
- डॉ. धनंजय कुलकर्णी, माजी सिनेट सदस्य
कुलगुरू उच्चविद्याविभूषित आणि चारित्र्यसंपन्न हवे
‘निवड समितीने कुलगुरुंची निवड करताना, ती व्यक्ती उच्चविद्याविभूषित असण्यासोबतच चारित्र्यसंपन्न हवी, याची काळजी घेतली पाहिजे. सेवेच्या कार्यकाळात त्यांच्यावर कोणताही आरोप झालेला किंवा कारकीर्द वादग्रस्त नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे. कुलगुरुंची निवड झाल्यावर आरोप-प्रत्यारोप योग्य राहत नाही. त्यामुळे कुलगुरू निवडीची प्रक्रिया निष्पक्ष होऊन, पुणे विद्यापीठाचा कारभार यशस्वीपणे चालविण्याचा आत्मविश्वास असणाऱ्याची कुलगुरूपदी निवड झाल्यास ती सार्थ ठरेल,’ असे अभ्यासक डॉ. ए. पी. कुलकर्णी यांनी सांगितले.NCERT: बारावी इतिहासाच्या पुस्तकातून मुघल साम्राज्याशी संबंधित धडे काढले

NCERT Syllabus: इयत्ता बारावीच्या इतिहास पुस्तकातून मुघल सम्राट धडा काढून टाकण्यात आला आहे. याचा अर्थ बारावीच्या विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात आता विद्यार्थी मुघल साम्राज्याचा इतिहास वाचणार नाहीत. आता एनसीईआरटीची पुस्तके वापरणारे सर्व बोर्ड या नवीन नियमाचे पालन करणार आहेत. मुख्यतः सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. याशिवाय, यूपी बोर्डाच्या इतर एनसीईआरटी पुस्तकांमध्ये हा बदल लागू होणार आहे.
आता एनसीईआरटीची पुस्तके वापरणारे सर्व बोर्ड या नवीन नियमाचे पालन करणार आहेत. मुख्यतः सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. याशिवाय, यूपी बोर्डाच्या इतर एनसीईआरटी पुस्तकांमध्ये हा बदल लागू होणार आहे.
बदल या वर्षापासून लागू
हा बदल शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून लागू होणार आहे. अद्ययावत अभ्यासक्रमानुसार, NCERT ने 'किंग्स अँड क्रॉनिकल्स; मुघल दरबार (१६वे आणि १७वे शतक)' 'थीम ऑफ इंडियन हिस्ट्री-भाग II' या इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहे.नागरिकशास्त्राच्या अभ्यासक्रमातही बदल
इतिहासासोबतच NCERT ने नागरिकशास्त्राचा अभ्यासक्रमही बदलला आहे. 'अमेरिकन हेजेमनी इन वर्ल्ड पॉलिटिक्स' आणि 'द कोल्ड वॉर एरा' यासारखे धडे काढून टाकण्यात आले आहेत. तसेच, बारावीच्या 'इंडियन पॉलिटिक्स आफ्टर इंडिपेंडन्स' या पाठ्यपुस्तकातून 'राइज ऑफ पॉप्युलर मूव्हमेंट्स' आणि 'एरा ऑफ वन-पार्टी डोमिनेन्स' हे प्रकरण वगळण्यात आले आहेत.
दहावीच्या अभ्यासक्रमात बदल
बारावी सोबतच NCERT ने दहावी आणि अकरावीची काही पुस्तके देखील काढून टाकली आहेत. 'थीम इन वर्ल्ड हिस्ट्री' या इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकातून 'सेंट्रल इस्लामिक लँड्स', 'क्लॅश ऑफ कल्चर' आणि 'इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन' यांसारखे धडे काढून टाकण्यात आले आहेत.यासोबतच इयत्ता दहावीच्या 'डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स-II' या पाठ्यपुस्तकातून 'लोकशाही आणि विविधता', 'लोकप्रिय संघर्ष आणि चळवळी', 'लोकशाहीची आव्हाने' हे प्रकरण काढून टाकण्यात आले आहेत.
यूपी बोर्डाकडून अभ्यासक्रम अपडेट
उत्तर प्रदेश बोर्डाचे सचिव दिव्यकांत शुक्ला यांनी पुस्तकातील बदलांच्या माहितीला दुजोरा दिला. नवीन अभ्यासक्रम यूपी बोर्ड अभ्यासक्रम २०२३-२४ मध्ये अपडेट करण्यात आला आहे. तो लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासोबतच नवीन अभ्यासक्रम असलेली पुस्तके बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
PM Shri School:‘पीएमश्री’त पुण्यातील २३ शाळा

PM Shri schools: शाळांची पारदर्शकपणे निवड करण्यासाठी pmshrischools.education.gov.in या पोर्टलवर शाळांनी स्वतः अर्ज करून विविध तीन आव्हानांचे टप्पे पार करणे आवश्यक होते. त्यानुसार प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी ऑनलाइन अर्ज केले. या टप्प्यांमध्ये पात्र ठरण्यासाठी शहरी भागांसाठी ७० टक्के, तर ग्रामीण भागांसाठी ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. हे टप्पे पार करणाऱ्या शाळांची तज्ज्ञांच्या समितीने निवड केली आहे.
हायलाइट्स:
- 'पीएमश्री'त पुण्यातील २३ शाळा
- तज्ज्ञांच्या समितीकडून निवड
- तीन आव्हानांचे टप्पे पार करणे आवश्यक
केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील २३ शाळांची निवड केली आहे. येत्या काळात या शाळांचा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकास केला जाणार आहे. नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यांतील प्रत्येकी २६ शाळांची, तर सोलापूर जिल्ह्यातील २३ शाळांचा समावेश यात करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या उपसचिव डॉ. प्रीती मीना यांनी याबाबतचे पत्र नुकतेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांना पाठविले आहे. या पत्रात ‘पीएमश्री योजने’साठीचे निकष पूर्ण करणाऱ्या, सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या ४२६ प्राथमिक आणि ९० माध्यमिक अशा एकूण ५१६ शाळांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने पीएमश्री योजनेला सात सप्टेंबर २०२२ रोजी मान्यता दिली.
सध्या ५१६ शाळांना मान्यता
पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. या योजनेत येत्या वर्षात १,३५१ आयसीटी लॅब, २,०४० डिजिटल लायब्ररी, १० हजार ५९४ स्मार्ट क्लासरूम्स, १०५ स्टेम लॅब, ५३३ टिंकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत. ९७ हजार २४९ टॅब देण्यात येतील.
पीएमश्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांच्या माध्यमातून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ची प्रभावी अंमलबजावणी होण्याबरोबरच केंद्राच्या सहकार्याने दर्जेदार शिक्षणासाठी आदर्श शाळा विकसित होतील. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास करण्यात येईल.
- दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
प्रत्येक शाळेला पाच वर्षांसाठी एक कोटी ८८ लाख
या योजनेत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ची प्रभावी अंमलबजावणी करणे; तसेच निष्पक्षता, प्रवेश, गुणवत्ता आणि समावेश या पातळ्यांवर सर्वसमावेशक, समर्पित समग्र परिवर्तन घडविण्याचा उद्देश आहे. या योजनेत देशात एकूण १४ हजार ५०० शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. ही योजना पाच वर्षांसाठी राबविली जाणार असून, या अंतर्गत निवड झालेल्या शाळा आदर्श शाळांत रूपांतरित होणार आहेत. या योजनेत निवड झालेल्या शाळांसाठी ६० टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळणार असून, राज्य सरकारचा हिस्सा ४० टक्के आहे. यासाठी राज्य सरकार प्रत्येक शाळेला पाच वर्षांसाठी एक कोटी ८८ लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.बांधकाम, पायाभूत सुविधांसाठी पैसे मिळणार
- राज्य सरकारने ‘पीएमश्री योजने’त राज्याच्या हिश्शापोटी ९१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.- आदर्श शाळांसाठी २०२२-२३मध्ये ४७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी २५४ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
- पुढील वर्षी मोठ्या बांधकामांसाठी प्राथमिक शाळांसाठी १९९ कोटी ४० लाख रुपये, तर माध्यमिकसाठी ५६ कोटी १२ लाख रुपये इतका निधी ठेवण्यात आला आहे.
- ‘समग्र शिक्षा’अंतर्गत पायाभूत सुविधांसाठी ८६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.