आज पुन्हा दगडफेक आणि गोळीबार, बंगाल अद्यापही अशांत ?...
रामनवमी नंतर घटनेच्या ठिकाणी पुन्हा प्रतिवाद उच्च न्यायालयाने आदेश देऊनही सुरक्षा यंत्रणा ढिम्मच...
३० मार्च रोजी हावड़ा मध्ये रामनवमी च्या यात्रेदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद रविवारी १७ मार्च रोजी पुन्हा उमटले, ह्यात दैनिक डिजिटल चे मुख्य कार्यकारी संपादक श्री. महादेव इंगळे यांच्यासह तीन अन्य व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजिकच्या शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

कोलकता: 30 मार्च रोजी हावडा जिल्ह्यात रामनवमी मिरवणुकीत कथित दगडफेकीनंतर झालेल्या हिंसाचारात 10 जण जखमी झाले होते. पुढील तीन दिवसांत, हिंसाचार उत्तर दिनाजपूर आणि हुगळी जिल्ह्यात पसरला, जिथे आठ लोक जखमी झाले. हिंसाचाराच्या घटनांची चौकशी एनआयएकडे करण्याची मागणी करणारी याचिका भाजपने दाखल केली आहे.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) तीन जिल्ह्यांमध्ये उसळलेल्या हिंसाचाराची आणि त्यात अनेक लोक जखमी झाल्याच्या घटनांची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.
वरिष्ठ महाधिवक्ता एसएन मुखर्जी यांनी या याचिकेला
विरोध केला की राज्य पोलीस या प्रकरणाची आधीच
चौकशी करत आहेत.
खंडपीठाने म्हटले, 'हावडा पोलिस आयुक्तांनी 54 पानांचा अहवाल
दाखल केला आहे, ज्यात पूरक अहवालांचा समावेश आहे...
तुमचा (राज्याचा) अहवाल प्रथमदर्शनी दाखवतो की
ही सर्व (हिंसा) पूर्वनियोजित होती.
छतावरून दगडफेक केल्याचा आरोप आहे. साहजिकच 10 ते 15 मिनिटांत
दगड टेरेसवर नेणे कोणालाही शक्य नाही.
ह्यावर अधिक वृत्त लवकरच..
राष्ट्रीय वृत्त सेवा..
Facebook
Twitter
आमच्यासोबत जाहिरात करण्यासाठी
आपला उद्योजक समूह
Contact
Our Authors
Home Page
Instagram