धक्कादायक! ९९ रुपयांत विकली गेली 'या' बँकेची शाखा!
धक्कादायक! ९९ रुपयांत विकली गेली 'या' बँकेची शाखा!
सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोर घोषित

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेचे शेअर्स कोसळल्याचा परिणाम भारतासह जगाला भोगावा लागत आहे. शेअर बाजारावरही याचा परिणाम जाणवला आहे. विशेष म्हणजे लंडनच्या सिलिकॉन व्हॅली बँकेच्या शाखेचा सौदा केवळ एका युरोला झाला आहे. म्हणजे अवघ्या ९९ रुपयात एचएसबीसी बँकेला ही शाखा विकण्यात आली. तंत्रज्ञान व लाईफ सायन्स क्षेत्रात बँकेचे मोठे नुकसान झाल्यानंतर हा व्यवहार झाला. फेडरल रिझर्व्हच्या कठोर नियमावलीमुळे हा फटका बसला आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली बँक बंद होणे हे जागतिक संकट मानले जात आहे. ही अमेरिकेतील सोळाव्या क्रमांकाची बँक आहे. आंतरराष्ट्रीय बँक असल्याने बँकिंग क्षेत्रातील शेअर बाजारात ८.१ टक्क्याने घसरला. तीन वर्षांतील मोठी घसरण आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. शुक्रवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. यामुळे अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
सिलिकॉन व्हॅली बँक बंद का झाली ?
एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशन'तर्फे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेची संपत्ती २१० अब्ज डॉलरपेक्षा जास्त असून अमेरिकेतील अनेक ठिकाणी तिच्या शाखांचे जाळे विस्तारले होते. व्याजदर वाढल्याने बँकेची स्थिती खालावत राहिली. सिलिकॉन व्हॅली बँक टेक कंपन्या आणि नवीन उपक्रमांना आर्थिक सहाय्य पुरवते.
तंत्रज्ञान आणि हेल्थकेअर कंपन्यांकडे एकूण ४४ टक्के व्यवसाय आहे. यूएस फेडरल रिझर्व्हतर्फे व्याजदरात घट करण्यात आली होती. त्याचा या क्षेत्रावर विपरित परिणाम झाला. SVB बँकेच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाल्याने या क्षेत्रांमधील गुंतवणूकदारांचा हिरमोड झाला. बँकेची कर्ज बुडीत निघाल्याने आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम ही कारणे बँक दिवाळखोरीत निघण्यासाठी कारणीभूत ठरली.
■■सिलिकॉन व्हॅली बँकेचे पतन ■■
■ संपूर्ण US बँकिंग क्षेत्रात ही डोमिनो इफेक्टची सुरुवात आहे का?
#SVB फायनान्शिअल ग्रुप (SIVB.O) ही #US च्या इतिहासात 2008 च्या आर्थिक संकटानंतर, शुक्रवारी अचानक कोसळून अपयशी ठरलेली सर्वात मोठी बँक बनली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) FDIC ने बंद केली आहे.
SVB ने त्यांचे ऑनलाइन बँकिंग आणि अॅप देखील बंद केले आहे आणि शाखा आणि एटीएम देखील बंद केले आहेत. वरवर पाहता #TuckerCarlson नुसार, "जेव्हा ग्राहक आज मॅनहॅटन मधील SVB च्या शाखेत त्यांच्या ठेवी घेण्यासाठी आले, तेव्हा व्यवस्थापकांनी पोलिसांना बोलावले."
महिनाभरा पूर्वी फोर्ब्स मासिकाने ‘अमेरिकेच्या सर्वोत्कृष्ट बँकांपैकी एक’ म्हणून 100 मध्ये 20 व्या क्रमांकावर तिचा गौरव केला होता. 🤔🤔🤔🤔🤔
आता US बँक नियामकांनी डिसेंबर 2007-जून 2009 च्या मोठ्या मंदीनंतर सर्वात मोठ्या बँक अपयशा मध्ये सिलिकॉन व्हॅली बँक जप्त केली आहे.
SVB ही US आधारित बँक आहे जी तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण डोमेन मधील स्टार्टअप कंपन्यांच्या अद्वितीय आवश्यकता पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करते.
12 दिवसांपूर्वी, सिलिकॉन व्हॅली बँकेचे सीईओ ग्रेगरी बेकर यांनी त्यांचे 11% शेअर्स विकले.
डॅनियल बेक, CFO , यांनी त्यांच्या होल्डिंगपैकी 32% विकले
CMO मिशेल ड्रॅपर 28% विकले.
जेव्हा फोर्ब्स सर्वोत्तम रँकिंग देत होते आणि मूडी SVB-ला ए रेटिंग देत होते,
SVB चे CEO, CMO आणि CFO त्यांचे स्टॉक विकत होते.
Something doesn't seem right...
सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) दिवाळे निघाल्याने कोट्यवधी रुपये गायब झाले.
NYT, गांधी घराण्याचा नोकर रघु राम राजन सारखे अर्थतज्ज्ञ आणि WaPo सारखे प्रामाणिक माध्यम काय करत होते? SVB बद्दल भाकीत करु शकले नाहीत किंवा वाचवू शकले नाहीत!
- महादेव इंगळे
आता Dainik Digital च्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा.