“AI” तंत्रज्ञानामुळे लाखो भारतीयांच्या नोकऱ्यांवर संकट येणार का ? काय आहे हे तंत्रज्ञान समजून घेऊ !
- Get link
- X
- Other Apps
“AI” तंत्रज्ञानामुळे लाखो भारतीयांच्या नोकऱ्यांवर संकट येणार का ? काय आहे हे तंत्रज्ञान समजून घेऊ !

मित्रांनो आपण नेहमी ऐकत आलोय, टेक्नॉलॉजि चे जसे फायदे आहेत तसेच तोटे सुद्धा आहेत. सरळ मुद्द्यावर येऊ. “AI” म्हणजे “Artificial Intelligence” म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. ज्याप्रमाणे माणसाला निसर्गाने “नैसर्गिक बुद्धिमत्ता” प्रदान केली आहे, ज्याद्वारे माणूस बुद्धीचा वापर करून, मेंदूत साठवलेल्या माहितीचे आकलन, विश्लेषण करून, चांगले वाईट निर्णय घेऊ शकतो तशीच बुद्धिमत्ता माणसाने मशीनसाठी बनवली आहे ज्याला “कृत्रिम बुद्धिमत्ता” असे म्हणतात. थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्र आहे ज्यामधे कोणतेही यंत्र माणसासारखे काम करू शकेल.
आर्टिफिश्यल इंटेलिजेंस हे टॉप टेक्नॉलजीमध्ये पहिल्या क्रमांकावर येते. आर्टिफिश्यल इंटेलिजेंस म्हणजेच एखाद्या मशीनीमध्ये माणसाप्रमाणे विचार करू शकण्याची, समजू शकण्याची व निर्णय घेण्याची क्षमता विकासीत करणे. सध्या भारतासह जगभरातल्या अनेक देशात आर्टिफिश्यल इंटेलिजेंसचा वापर अनेक क्षेत्रात सुरु झाला आहे. आतापर्यंत जे कम्प्युटर आणि रोबोट्स ला स्वतःची अशी विचार करण्याची क्षमता नव्हती, त्यांना प्रोग्रामिंग द्वारे ज्या सूचना देत असू त्याच सूचनांचे ते पालन करत असे.
आपल्याला माहीतच असेल मागच्या काही वर्षात वाहन बनवणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या, हॉस्पिटल्स, इंडस्ट्रीझ मध्ये रोबोट्स मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. मोटार वाहन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये गाडीला पेंट करण्यापासून ते फिटिंग करण्यापर्यंत अनेक कामे रोबोट्स करतात, त्याचप्रमाणे मोठमोठ्या हॉस्पिटल मध्ये अनेक शस्त्रक्रिया देखील रोबोट्स कडून केली जाते. परंतु या रोबोटिक मशिन्सना काही मर्यादा होत्या. “AI” तंत्रज्ञान यापेक्षा कितीतरी अधिक पटीने पुढे आहे. कारण फक्त मोठमोठ्या क्षेत्रापुरती मर्यादित असणारी हि टेक्नॉलॉजि आता सर्वसामान्यांच्या आयुष्याचा भाग असलेल्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात कार्यरत व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण कृत्रिम का होईना पण स्वतःची बुद्धिमत्ता आता मशिन आणि रोबोट्स ला आलेली आहे. खाली दिलेल्या डायग्राम वरून हे आपल्याला कल्पना येईल या टेक्नॉलॉजि ची निर्णय क्षमता किती मोठी आहे.

आता या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांवर कसा परिणाम होईल ते आपण पाहू.
सध्या जगभरात चर्चेत असणारे ChatGTP नावाचे सॉफ्टवेअर हे “AI” तंत्रज्ञानाचाच भाग आहे. या सॉफ्टवेअरचा वापर मोफत असून तुम्हाला गुगल वर मिळेल. आता एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करत असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर ला त्याचा बॉस एखादा सॉफ्टवेअर कोडिंग प्रोग्राम लिहायला सांगतो. हा प्रोग्राम लिहायला, विचार करायला आणि Execute करायला त्याला काही तास, काही दिवस सुद्धा लागू शकतात. परंतु “AI” सॉफ्टवेअर मध्ये काही किवर्डस टाकल्यास काही सेकंदातच हे सॉफ्टवेअर स्वतः संपूर्ण कोडिंग प्रोग्राम लिहून तुमच्या समोर सादर करतो.
दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या लेखकाला एखादे पुस्तक लिहायला काही महिने किंवा वर्षे लागतात. पण “AI” सॉफ्टवेअर मध्ये काही किवर्डस टाकल्यास हे सॉफ्टवेअर जगभरातील हजारो पुस्तके काही सेकंदातच चाळून, त्यातला मजकूर आधी समजून घेऊन तुमच्यासमोर तुम्हाला हव्या तेवढ्या शब्दांत सर्व लेख लिहून देते आणि तेही तुम्हाला हव्या त्या इमेज स्वतःच एडिट करून, यालाच “डीप लर्निंग” असे म्हणतात. म्हणजे एखाद्या विषयावर पुस्तक लिहायला आणि ते प्रसिद्ध करायला तुम्हाला महिनोंमहिने वाट पाहायची गरज नाही. अगदी काही वेळातच तुम्ही तुमचे पुस्तक प्रकाशित करू शकता. एखाद्या विषयावरील छायाचित्रे बनवण्यासाठी ग्राफिक डिझाइनरला तासनतास मेहनत घेऊन आपली क्रिएटिव्हिटी खर्च करावी लागते, परंतु हे काम काही सेकंदातच “AI” सॉफ्टवेअर पूर्ण करते. यासोबतच कोणत्याही विषयावरील ई मेल लिहिणे ते ई मेल पाठवणे, रिपोर्ट बनवणे इत्यादी अनेक कामे अगदी काही क्षणातच हे सॉफ्टवेअर करते. यावरून तुम्हाला या कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याप्ती लक्षात आली असेल.
एखाद्या मोठ्या कंपनीच्या ऑफिस मध्ये स्वागत कक्षात बसवलेला रोबोटिक Executive हा ग्राहकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. तसेच ग्राहकांना फॉर्म भरण्यापासून ते बाकीच्या सर्व अडचणी काही सेकंदातच सोडवू शकतो. अशा कंपनीचे उदाहरण पाहू या ज्यास त्याच्या सर्व 15-20 हजार रेकॉर्ड्सची एखाद्या विशिष्ट प्रकारे क्रमवारी लावायची आहेत. जर मनुष्याने ही गोष्ट केली असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि वेळ देखील आवश्यक आहे, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता हे काम काही मिनीटांत करू शकते.

machine learning engineers, deep learning engineers, artificial intelligence trainers, natural language processing engineers, artificial intelligence specialists, deep learning engineers, computer vision, AI & Deep Learning, Deep Learning & Machine Learning, Deep Learning & Data Scientists, etc.