कीटकांमध्ये जीवनसत्त्वे असतात, मुकाट्याने का! मुख्याध्यापक मोहम्मदचे अजीब लॉजिक...
कीटकांमध्ये जीवनसत्त्वे असतात,मुकाट्याने खा!; मुख्याध्यापक मोहम्मदचे अजब लॉजीक..
रागाच्या भरात तोडला तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्याचा हात.

पाटणा : बिहारमधील वैशाली (वैशाली, बिहार) जिल्ह्यातील लालगंज अतातुल्लापूर येथील एका माध्यमिक शाळेत माध्यान्ह भोजनात किडे पडल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी याची माहिती मुख्याध्यापक मोहम्मद मिसवद्दीन यांना दिली असता त्यांनी "कीटकांमध्ये जीवनसत्त्वे असतात", त्यामुळे मुकाट्याने खा, असे सांगितले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी ते अन्न खाण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या मुख्याध्यापक मोहोम्मद मिसवद्दीन यांनी रागाच्या भारात केलेल्या मारहाणीत एका विद्यार्थ्याचा हात तुटला. या घटनेनंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शाळेत येत मुख्याध्यापका विरोधात संताप व्यक्त केला.या घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाने तपास सुरू केला आहे.
शनिवारी (१२ नोव्हेंबर २०२२) अत्तुल्लापूर येथील मिडल स्कूलमध्ये मुलांना माध्यान्ह भोजन देण्यात आले. जेवणात भात होता. विद्यार्थ्यांनी जेवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना भातामध्ये किडे असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक मोहम्मद मिसवद्दीन यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी मुलांना अन्न खाण्यापासून रोखण्या ऐवजी मुख्याध्यापकाने कीटकांमध्ये जीवनसत्त्वे असतात, असा अजब तर्क लढवून त्यांना किडे असलेल्या अन्नाचे सेवन करण्यास भाग पडले. परंतु काही विद्यार्थ्यांनी मोहोम्मद मिसवद्दीन यांच्या तुघलकी आदेशाचे पालन ना केल्याने, त्यांचा तीळपापड झाला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. मिसवद्दीनने एका विद्यार्थ्याला इतकि जबर मारहाण केली कि त्यामध्ये त्याचा हात तुटला.
ही बाब नातेवाइकांना समजताच त्यांनी शाळेत येऊन याप्रकरणी जाब विचारत, या प्रकरणाची तक्रार शिक्षण विभागाकडे केली. तक्रार आल्यानंतर शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक शाळेत पाठवले आहे.
शिक्षणाधिकारी परशुराम सिंह यांनी शाळेत पोहोचून मुलांशी बोलून विद्यार्थ्याच्या तुटलेल्या हाताचा वैद्यकीय अहवाल पाहिला. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप खरा ठरल्यास मुख्याध्यापकांवर कडक कारवाई केली जाईल. बिहारमध्ये मध्यान्ह भोजनाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. नुकतेच भागलपूरमध्ये 200 हून अधिक मुले माध्यान्ह भोजन खाल्ल्याने आजारी पडली,अशी माहिती मिळते.
वर आम्हाला फॉलो करा,