मध्यावधी निवडणुकांबाबत वावड्या उठवणाऱ्यांवर फडणवीसांचा हल्लाबोल!


मध्यावधी निवडणुकांबाबत वावड्या उठवणाऱ्यांवर फडणवीसांचा हल्लाबोल!

    07-Nov-2022 
DEVNADRA



मुंबई:
सर्वोच्च न्यायालयाने ews आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. तर यावेळी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात आलेल्या भारत जोडो यात्रेवरून उपरोधिक टोलेबाजीही केली.



"मा. पंतप्रधान मोदजींच्या सरकारने जे आरक्षण दिले होते. ते सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. यामुळे एकीकडे जातीय आधारावर आरक्षण कायम आहे. मात्र त्याबरोबर ज्या घटकांना आरक्षण मिळत नव्हतं अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही 10 टक्के आरक्षण मिळणार आहे". विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यात आज मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत नव्याने मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या मराठा समाजाच्या गरिबांनाही हे ews चे आरक्षण लागू असणार आहे.





अल्पसंख्याक समाजातील गरीबांनादेखील हे आरक्षण लागू असणार आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या गरिबांना या आरक्षणामुळे शिक्षण आणि नोकरीचा मार्ग मोकळा केला आहे. मोदींजींच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असेही फडणवीस यावेळी म्हणाले."Ews च्या संदर्भात जी 10 टक्क्यांची मर्यादा ओलांडून हे आरक्षण देण्यात आलं. त्यावरचं हा मुद्दा होता. त्याला आता सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. मात्र आजचा निर्णय हा मैलाचा दगड ठरेल", असेही फडणवीस म्हणाले.
 


'भारत जोडो यात्रा सुखरूप महाराष्ट्राबाहेर जाईल याची काळजी घेऊ'



राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं महाराष्ट्रातील राजकारणावर फार परिणाम होईल असे वाटतं नाही. यात्रा महाराष्ट्रात आली आहे. सुखरूपपणे महाराष्ट्राबाहेर जाईल अशी व्यवस्था आम्ही करू. जे काही कार्यक्रम त्यांनी कायदेशीररीत्या पार पाडले जातील याचीही व्यवस्था आम्ही ठेवू, असा उपरोधिक टोला फडणवीसांनी भारत जोडो यात्रेवरून लगावला.




'मोदीजी को हटाने के लिए साथ आओ' यात्रा


आदित्य ठाकरेही या यात्रेत सहभागी होत आहे. यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, ज्यांना ज्यांना या यात्रेत सहभागी होयचं आहे त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं. कारण ही भारत जोडो यात्रा नाहीये तर ही 'मोदीजी को हटाने के लिए साथ आओ' यासाठी यात्रा आहे. मात्र कितीही साथ मे आओ असे यांनी केलं तरी मोदीजी हटणार नाहीत. कारण मोदीजी लोकांच्या मनात आणि हृदयात आहेत, असे म्हणत फडणवीसांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना यांना तोल लगावला. भारत जोडो यात्रा असो किंवा इतर कोणती भाजपमध्ये मोठ्याप्रणामवर लोक येत आहे. कारण मोदीजी देशाला जे नेतृत्व देत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे. कोणत्याही नेत्याला एक सक्षम नेतृत्व हवं असतं. त्यांना लक्षात येतं इथे नेतृत्ब आहे म्हणून आमच्याकडे लोक येत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.



'आपले आमदार सोडून जातील ही काही पक्षांना भीती म्हणून मध्यवधीच्या वावड्या'

आता अनेक पक्षांना ही भीती वाटू लागली आहे की देशातील वातावरण पाहता आणि महाराष्ट्रातील वातावरण पाहता (बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप) कदाचित आपले आमदार आपल्या पक्षात टिकणार नाहीत. ते पक्ष सोडून जातील अशी भीती वाटतं असल्याने त्यांना सांत्वना देण्यासाठी आणि तुम्ही गेलात तर आता निवडणुका लागणार आहेत अशा वावड्या उठविण्याचे काम सुरू आहे. आमचं सरकार मजबूत आहे, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

- वार्तांकन महादेव इंगळे 

Popular posts from this blog

Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

श्श...! 'हे' Android ऍप गुपचूप चोरत आहेत तुमचा डेटा, लगेच करा डिलीट!!!!!!;

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!