रंगभूमीवरील बॅरिस्टरने घेतला कायमचा पॉज..😭😭

Saturday, November 26, 2022

रंगभूमीवरील बॅरिस्टरने घेतला कायमचा पॉज..

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्या आड

    26-Nov-2022 


Vikram Gokhale passed away
 
 
 
मुंबई ( Vikram Gokhale passed away ) : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालायात निधन झाले आहे. अभ्यासू, शिस्तबद्ध आणि समर्पित नट अशी त्यांची ओळख आहे. पणजी,आजी व वडील असा तीन पिढय़ांपासून अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या विक्रम गोखलेंनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले. 'बॅरिस्टर' या मराठी नाटकातील त्यांनी साकारलेली 'बॅरिस्टर'ची अजरामर भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
 
 
विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या,तर आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बाल-अभिनेत्री. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. मात्र, विक्रम गोखलेंनी अभ्यासपूर्वक अभिनयातले कंगोरे हुडकून स्वतःची शैली व स्वतंत्र ओळख निर्माण केली.
 
 
हम दिल दे चुके सनम, भूलभुलैया, मिशन मंगल, अग्निपथ, दिलसे यासारख्या अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये विक्रम गोखले यांनी स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकल होतं. २०१० मध्ये त्यांनी आघात या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अनुमती या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
 
 
नुकताच प्रदर्शित झालेल्या 'गोदावरी' या मराठी चित्रपटात त्यांनी नारोपंत देशमुख हि भूमिका साकारली होती. मागच्या काही काळापासून घश्याला त्रास होत असल्याने त्यांनी रंगभूमीवर काम करणे बंद केले होते. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याच काम करत होते.मागच्या अनेक वर्षांपासून अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी मदतीचे कार्य करत आहेत. कलावंताना उतार वयात आसरा असावा यासाठी विक्रम गोखले यांनी दोन एकर जमीन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली होती.
 
 
विक्रम गोखले यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणारा पुरस्कार मिळाला होता. २०१६ मध्ये राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे विक्रम गोखले यांना ‘राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. कला क्षेत्रातील अत्यंत मनाचा समजल्या जाणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी विक्रम गोखले यांना गौरवण्यात आले आहे. सध्या स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर ते 'तुझेच मी गीत गात आहे' या मराठी मालिकेत काम करत होते.
 
 
त्यांच्या जाण्याने कलाविश्वाने कलेचा साकल्याने विचार करणारा, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारा, त्या संदर्भात बांधीलकी जपणारा एक कर्ता रंगधर्मी गमावला.
 
 
आता बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Telegram वर आम्हाला फॉलो करा,

 

Popular posts from this blog

Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

श्श...! 'हे' Android ऍप गुपचूप चोरत आहेत तुमचा डेटा, लगेच करा डिलीट!!!!!!;

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!