एक मराठा व्यवसाय संघ अबू धाबीत

एक मराठा व्यवसाय संघ मार्फत उप विभागीय अधिकारी मुंबई श्री, त्रिलोचन वैद्य यांनी अबू-धाबी - SIAL - मध्य पूर्व प्रदर्शन भेट दिली
येथे अबू धाबी चेंबर ऑफ कॉमर्स हेड ॲडमिन, ते अबू धाबी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनला भेटले. हे UAE मध्ये भारतीय सहभागी निर्यातदार व्यवसाय सुरक्षित करण्यास मदत करते.
तसेच SIAL प्रदर्शनात, सहभागींना खाद्यपदार्थांचे ज्ञान मिळते जे भविष्यात निर्यात करण्याच्या योजनेसाठी विविध देशांनी प्रदर्शित केले होते.
सन 2025 पर्यंत 01 लाख उद्योजक निर्माण करण्याचं ध्येय बाळगून एक मराठा व्यवसाय संघ तर्फे इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जातात, त्याचबरोबरीने अगदी तळागाळातील लोकांपर्यंत व्यवसाय संकल्पना पोहोचविण्यासाठी संघ मागील 02 वर्षांपासून प्रयत्नशील आहे, 
ह्याचं कार्यक्रमाचा भाग म्हणून संघाचे विभागीय उपसंचालक त्रिलोचन वैद्य सध्या दुबईत आहेत, अबूधाबीत सध्या SIAL- मध्य पूर्व प्रदर्शन सुरू आहे!
अबू धाबी चेंबर ऑफ कॉमर्स हे भारतीय सहभागी निर्यातदारांना व्यवसाय सुरक्षित होण्यासाठी मदत करते.ह्या प्रदर्शनात विविध देशांतील व्यवसाय संघ सहभागी झाले होते. 
       भारतातील मागील दोनशे वर्षांचा इतिहास जर पडताळून पाहिल्या तर, असे दिसते की, एक गुजराती आणि सिंधी समाज सोडून अन्य समाजातील व्यावसायिक अगदी बोटावर मोजता येतील इतकेच आहेत, ही संख्या वाढावी आणि भारत १००% आत्मनिर्भर होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातील व्यावसायिक स्वराज्य निर्माण करण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न एक मराठा व्यवसाय संघ मार्फत केला जात आहे!
2016 सारुन केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा योजनेचा लाभ जवळपास 30लाख लोकांनी घेतला, परंतु पुढील काही महिन्यांत जवळजवळ 65% हून अधिक स्टार्टॷप बंद पडले, अपूरे ज्ञान, जलद प्रगती करण्याची घाई झाली, परिणामी 42% कर्जफेड अद्याप बाकी असल्याने नवीन होतकरू तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाहीत.
       अनेक वर्षांपासून केलेल्या संशोधनातून  अगदी सोप्या पद्धतीने घरातूनच फळ प्रक्रिया करण्याची पद्धत एक मराठा व्यवसाय संघ जाणून आहे, ह्याच माध्यमातून विविध प्रकारचे साबण तेल मसाले पापड लोणची चटण्या सुद्धा आता सहजपणे परदेशात विक्री करण्याचे प्रशिक्षण एक मराठा व्यवसाय संघ मार्फत केले जात आहे, 
जागरूक आणि इच्छुक नागरिक ह्याचा लाभ नक्कीच घेऊ शकतात
एक मराठा व्यवसाय संघ मार्फत उद्योजक व्हा शिबिर आयोजित

Popular posts from this blog

Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

श्श...! 'हे' Android ऍप गुपचूप चोरत आहेत तुमचा डेटा, लगेच करा डिलीट!!!!!!;

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!