स्वत:चे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर नराधमांवर श्रद्धा ठेवणे सोडा..!
स्वत:चे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर नराधमांवर श्रद्धा ठेवणे सोडा..!

मागील संपूर्ण आठवडाभर सगळीकडे केवळ एकच चर्चा सुरू आहे. श्रद्धा-आफताब प्रकरण, श्रद्धा वालकर खून प्रकरण... तुम्ही हवं ते नाव द्या. मात्र, जे घडलंय ते अतिशय भयंकर असून यातूनही जर आज आपण धडा घेतला नाही, तर आज एका मुलीचे 35 तुकडे मिळाले, पुढे न जाणे किती मुलींचे किती तुकडे हाती येतील? ऐकून अंगावर शहारा येतोय, मात्र ‘लव्ह जिहाद’ हे भीषण सत्य आहे आणि ते आपण स्वीकारणे व त्यावर त्वरित हालचाल करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे स्वत:चे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर नराधमांवर ‘श्रद्धा’ ठेवणे सोडा, हिंदू मुलींनो त्वरित सावध व्हा!
श्रद्धा वालकर... 27 वर्षांची तरुणी. नोकरी करणारी, कमावणारी, आजच्या जगातील ‘इंडिपेंडेंट’, स्वत:ची मतं असलेली आणि अनेकदा टोकाची मतं असलेली मुलगी. 25 वर्षांची असताना पालघर येथील आपलं घर सोडून मुंबईत नोकरीच्या शोधात येते. एका मल्टीनॅशनल कंपनीच्या ‘कॉलसेंटर’मध्येतिला नोकरी लागते आणि तिथेच तिला भेटतो आफताब. आफताब आमीन पूनावाला... एक 28 वर्षीय तरुण. त्याच्यासोबत तिची मैत्री होते. हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं आणि दोघं एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. दरम्यान, श्रद्धा तिच्या घरी जाते. तिच्या आईला तिच्या या प्रेमप्रकरणाबद्दल सांगते. तिच्या आईचा या प्रकरणाला कडाडून विरोध असतो. ‘मुलगा मुस्लीम आहे, आपल्याकडे हे चालणार नाही,’ हे आई तिला स्पष्टच सांगते. मात्र, श्रद्धा ऐकत नाही. श्रद्धाचे वडील तिच्या परिवारापासून वेगळे राहत असतात. त्यांना देखील या प्रकरणाची कल्पना दिली जाते. तेदेखील याचा तितक्याच कडाडून विरोध करतात. त्यावर श्रद्धा उर्मटासारखं “मी 25 वर्षांची आहे, माझे निर्णय मला घेता येतात आणि तुम्हाला ते मान्य नसतील तर समजा आजपासून तुमची मुलगी मेली” असं उत्तर देते आणि निघून जाते. तिला कल्पनाही नसेल की येत्या काही काळातच तिचे हे बोल खरे ठरणार आहेत!
अगदी ‘मेरा अब्दुल अलग हैं!’ पठडीतली ती उत्तरं देते. लहानपणीपासून ‘मजहब नहीं सिखाता आपस मैं बैर रखना..!’ हे मानत आलेल्या श्रद्धाची आफताबवर अंधश्रद्धा जडते आणि पुढे हीच अंधश्रद्धा तिचे अक्षरश: तुकडे करते. त्याचं एकमेव कारण श्रद्धाला लग्न हवं होतं आणि आफताबला नको! एवढं एक कारण पुरेसं होतं, आफताबसाठी थंड डोक्याने श्रद्धाचा खून करण्यासाठी, तिला मारून टाकण्यासाठी आणि एवढंच नव्हे, तर कसायाप्रमाणे तिचे 35 तुकडे करण्यासाठी! सर्वस्वी भीषण!!
ही दुर्देवी आणि देशाला हादरवून टाकणारी घटना दिल्लीत घडली. पण, या प्रकरणातील धार्मिक पैलू दुर्लक्षित करून अजिबात चालणार नाही. कारण, धर्म या गुन्ह्याचा मुख्य आधार आहेच. त्याला नाकारून चालणारच नाही. त्यामुळे सगळीच मुस्लीम मुलं सारखी नसतात, हिंदू मुलींशी लग्न केल्यावर मुस्लीम तरुणांचं काय होतं, हे कुठे समोर येतं वगैरे म्हणणार्यांना थोबाडीत मारणारं हे प्रकरण आहे. यातील जे झालं त्याच्या परिणामांपेक्षाही, त्यामागील कारणं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थितीत होतात.
- आफताबद्वारे सतत मारझोड करून सुद्धा (श्रद्धाच्या वडिलांनी नोंदवलेल्या ‘एफआयआर’नुसार) श्रद्धाने आपल्या आई- वडिलांजवळ न जाता, आपल्या घरी न परतता, या नराधमासोबत राहणंच का पसंत केलं असेल?
- आफताबद्वारे सतत मारझोड करून सुद्धा (श्रद्धाच्या वडिलांनी नोंदवलेल्या ‘एफआयआर’नुसार) श्रद्धाने आपल्या आई- वडिलांजवळ न जाता, आपल्या घरी न परतता, या नराधमासोबत राहणंच का पसंत केलं असेल?
- या आफताब पूनावालामध्ये श्रद्धाने इतकं काय बघितलं की तिला तिचा परिवार, मित्र आणि एक ‘सेफ’ आयुष्यच तिला नको झालं असेल? की ती त्या दोन वर्ष ओळख असलेल्या आफताबसोबत दिल्लीच्या मेहरौली या अतिशय अनोळखी ठिकाणी येऊन राहण्यासाठी तयार झाली असेल?
- तिला तिच्या परिवारावर विश्वास वाटला नसेल का ? त्यांच्याकडे तिला सुरक्षित न वाटता या माणसाबरोबर तिला सुरक्षित कसं वाटू शकतं? जो तिच्या शरीराचे तुकडे करतो, तिला एका फ्रिजमध्ये ठेवतो, त्याच फ्रिजमधून पाणी आणि दूध काढतो, चहा करतो. शी! किती भयंकर आहे हे! तिला याची पुसटशीही कल्पना नसेल का की हा माणूस तिच्या जिवासाठी घातक आहे?
- मुस्लीम मुलांमध्ये आकर्षित करणारं असं काय आहे की मुली वेड्यापिशा होऊन स्वत:चं धर्मपरिवर्तन करण्यापासून ते जीव देण्यापर्यंत सगळं सहन करायला धजावतात?प्रश्नांची यादी मोठी आहे आणि सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत. याबाबत सुरुवातीपासूनच घराघरांमधून कुठल्या पद्धतीची काळजी घेणं आवश्यक आहे?

संपूर्ण विचारार्थी काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडणे इथे क्रमप्राप्त ठरावे.
- घरात संवाद अत्यावश्यक आहे. आई- वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये खुला संवाद हा प्रत्येक घरात होणं अत्यंत गरजेचं आहे. घर हे प्रत्येक मुला/मुलींसाठी आपली सगळ्यात सुरक्षित जागा, आपला ‘सेफ झोन’ असलं पाहिजे. आपण चुकीचे निर्णय घेतले, तरी घरचे त्यातून आपल्याला बाहेर पडण्यात नक्की मदत करतील, किंबहुना तेच यातून आपल्याला बाहेर काढू शकतील, हा विश्वास असणं अत्यावश्यक आहे.
- आपण आपल्या मुलांना कितीही ‘सर्व धर्म समभाव’ किंवा ‘मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना’ शिकवलं, तरीही यातील धोके आणि अशा घटना, त्यातील सत्य योग्य त्या वयात मुलींसमोर आणणं आवश्यक आहे. हा संवाद आई-वडिलांकडून न संकोचता झालाच पाहिजे. आपल्याकडे अजूनही प्रेम, आकर्षण या विषयांवर घरी आई-वडिलांशी खुला संवाद होत नाही, तो होणं अत्यावशयक आहे.
- मुलींनी स्वत:च अतिशय डोळसपणे या सर्व घटनांचा विचार करणं आवश्यक आहे. जगात इक्का दुक्का तरुण असे असतीलही जे ‘लव्ह जिहाद’ या नावाखाली नाही तर खरोखर प्रेम करत असतील, मात्र धर्म अतिशय कट्टर आहे आणि हे प्रेम स्वीकारणं म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठी ‘रिस्क’ आहे, आणि ती अजिबात घेऊ नये. कारण, यामुळे तुम्ही आपल्या स्वत:च्या आई-वडिलांपासून दूर व्हाल, ही जाणीव मुलींमध्ये असणं अत्यावश्यक आहे.
- ‘लव्ह जिहाद’ बद्दल योग्य माहिती मुलींपर्यंत योग्य त्या वयात पोहोचली पाहिजे. मुलांच्या पटवण्याच्या पद्धती, त्याचे परिणाम आणि पुढे आपण एखाद्या सुटकेस नाहीतर फ्रिजमध्ये वीभत्स अवस्थेत आढळू शकतो, याची अंगावर काटा आणणारी भीती मुलींच्या मनात असली पाहिजे, जेणेकरून त्या या वळणाला लागणारच नाहीत आणि त्या परिस्थितीशी सामना नको म्हणून ठामपणे या सगळ्यापासून लांब राहतील.
श्रद्धा ही एकटी नाही, जी या सापळ्यात अडकली. निकिता तोमर जिने तौसिफवर प्रेम केले आणि आपला जीव गमावला, रितू जिने लायक खानवर प्रेम केले, प्रिया जिने शमशेदवर प्रेम केले, मानसी दीक्षित जिने मुजम्मिलवर प्रेम केले, शिवानी जिने आरिफ खानवर, तर खुशी परिहार जिने अशरफवर प्रेम केले, सीमा सोनी जिने नदीमवर प्रेम केले, तनिष्का जिने मुहम्मद साहिलवर, तर अंतिमा जिने रिझवानवर प्रेम केले. काही त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या तर काही सुटकेसमध्ये... काहींनी रुग्णालयामध्ये जीव दिला, तर काहींनी आत्महत्या केली. जीव गेला तो गेलाच आणि तरीही काही लोक म्हणत असतील की ‘लव्ह जिहाद’ ही एक ‘कॉन्स्पीरसी थिअरी’ आहे, तर येणार्या भविष्याविषयी काळजी वाटल्याशिवाय राहत नाही.
या सगळ्यात बॉलिवूड आणि सोशल मीडिया सारखी माध्यमे अतिशय हानिकारक ठरू शकतात. वर्षानुवर्षे आपल्या मनावर या माध्यमांद्वारे बिंबवण्यात आलं आहे की, मुस्लीम धर्म हा अतिशय चांगला आहे. शाहरुख खानचं उदाहरण देत त्याने कसा गौरीला सम्मान दिला, तिचे नाव बदलले नाही, धर्म बदलला नाही इत्यादी सांगण्यात येतं. मात्र, आमिर खान दोन हिंदू बायका करून दोघींना सोडून देतो, याविषयी कोणीच बोलत नाही. तसेच, सैफ अली खानचे. बरं व्यक्तिगत आयुष्य बाजूला जाऊ देत पण ‘पीके’सारख्या चित्रपटांमधून ‘सरफराज’ची ‘इमेज’ बिल्डिंग केली जाते आणि आपल्या भोळ्या (बावळट) हिंदू मुलींच्या मनात ‘मेरा अब्दुल वैसा नही हैं!’ हे पक्कं बसतं आणि पुढे श्रद्धासारखी त्यांची गत होते. त्यामुळे बॉलिवूड आणि सोशल मीडिया हे आभासी जग आहे, हे खरं नाही, अजेंडा ‘बेस्ड स्लो पॉयजनिंग’ आहे हे आपल्या मुलींना वारंवार सांगणं आज अत्यावश्यक आहे.
असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर चर्चा झाली पाहिजे, घराघरात संवाद झाला पाहिजे, तर आणि तरच हिंदू मुलींचे रक्षण शक्य आहे आणि तेव्हाच आपण यापुढे अनेक ‘श्रद्धांना’ वाचवू शकतो; अन्यथा आज एका श्रद्धाचे तुकडे फ्रिजमध्ये सापडले, उद्या दुसरी श्रद्धा आणखी कुठेतरी मिळेल आणि आपण याबाबत काहीच करू शकणार नाही. ही शोकांतिका होऊ द्यायची नसेल, तर आज आणि आत्ताच आपल्या हिंदू मुलींना सावध करणं आवश्यक आहे!
-निहारिका पोळ सर्वटे
वर आम्हाला फॉलो करा,