लव्ह जिहाद : हिंदू मुलींना अडकविण्यासाठी येतो परदेशातून निधी!

Tuesday, November 15, 2022

लव्ह जिहाद : हिंदू मुलींना अडकविण्यासाठी येतो परदेशातून निधी!

माजी पोलीस महासंचालक निर्मल कौर यांचा दावा

    15-Nov-2022 

श्रद्धा हत्याकांड
 
 
 
मुंबई : महाराष्ट्रातील तरुणीच्या 'श्रद्धा हत्याकांड'वरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. लिव्ह-इन पार्टनर आफताबने दिल्लीत श्रद्धाची निर्घृण हत्या केल्यानंतर त्याला फाशी देण्याची मागणी होत आहे. या हत्याकांडाचा हिंदूत्ववादी संघटना सातत्याने निषेध नोंदवत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर श्रद्धाच्या वडिलांनी मोठा आरोप केला आहे. हे संपूर्ण प्रकरण 'लव्ह जिहाद'चे असल्याचे श्रद्धाच्या वडिलांनी सांगितले. आफताबला फाशी देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
 
 
दरम्यान, झारखंडमधील निवृत्त डीजीपी या घटनेबाबद्दल बोलत असतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. "झारखंडमधील निवृत्त डीजीपी आता हिंदू मुलींना अडकवणं हा कुटीर उद्योग कसा बनला आहे." याबद्दल पोटतिडकीने सांगत आहेत. माजी DGP निर्मल कौर यांनी लव्ह-जिहाद चा पर्दाफाश करत म्हणाल्या, "तथाकथित शांतीप्रिय धर्माच्या मुलांकडून हिंदू मुलींना अडकवण्यात येत आहे. यासाठी त्यांना विदेशातून मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. मुलींना पैसे, गाड्यांचे आमिष दाखवले जात आहे. अशाप्रकारच्या अनेक घटना देशात सध्या घडत आहेत, आणि यांना पाठिंबा त्यांच्या धर्माकडून मिळत असतो. मुलींना केवळ उपभोगाची वस्तू समजली जाते." असेही त्या म्हणाल्या.
 
 
 
श्रद्धा हत्याकांड
 
 
 
 
दिल्ली येथे आफताब अमीन पूनावाला याने त्याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या श्रद्धा हिची सहा महिन्यांपूर्वीच 35 तुकडे करून हत्या केल्याचे दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पोलिसांनी आफताब यास अटक केली असून त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अंकित चौहान यांनी या हत्याकांडाची माहिती दिली. ते म्हणाले की, “श्रद्धा आणि आरोपी आफताब पूनावाला मुंबईहून दिल्लीला पोहोचले होते. मुंबईत श्रद्धा हिच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे दाखल केली होती. दिल्लीत दोघेही मेहरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कायदेशीर कारवाई सुरू केली.
 
 
आफताब मुंबईत खासगी क्षेत्रात काम करत होता. आफताब आणि श्रद्धा एका ‘डेटिंग’ अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्कात आले. यानंतर दोघेही ’लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले होते. पुढे श्रद्धाने आफताबकडे लग्न करण्याची मागणी करताच दोघांमध्ये वादांना प्रारंभ झाला होता. त्यानंतर मे 2022 मध्ये आफताब याने श्रद्धा हिची हत्या केली, तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते ‘रेफ्रिजरेटर’मध्ये भरून ठेवले होते. आफताब याने 18 दिवस दररोज एका तुकड्याची विल्हेवाट लावल्याची कबुली त्याने दिली आहे.
 
 
 
 
श्रद्धा हत्याकांड
 
 
 
 
मुंबईतून दिल्लीपर्यंत प्रवास
 
26 वर्षीय श्रद्धा ही मुंबईतील मालाडची रहिवासी होती. येथे ती एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘कॉल सेंटर’मध्ये काम करत होती. श्रद्धा आणि आफताब दोघेही ’कॉल सेंटर’मध्ये काम करत होते आणि तेथेच त्यांची ओळख झाली होती. दोघांचेही परस्परांवर प्रेम होते. मात्र, श्रद्धाच्या कुटुंबीयांचा दोघांच्या प्रेमसंबंधास विरोध होता. त्यामुळे श्रद्धा प्रथम आपले घर सोडून वसई येथे आफताबसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत होती. त्यानंतर दोघेही दिल्ली येथे राहत होते.
 
 
बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. FacebookTelegram वर आम्हाला फॉलो करा,
 
 
Advertise With Us https://mmmanagementpune.in/

 

Popular posts from this blog

Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

श्श...! 'हे' Android ऍप गुपचूप चोरत आहेत तुमचा डेटा, लगेच करा डिलीट!!!!!!;

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!