राहुल गांधी खेळ करणार का ?
सोनिया गांधीच्या जीवाला काॅंग्रेसकडूनच धोका
Friday, 11 November 2022 22:39 Pune
मुंबई: भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमी पाहता, गर्दी जरी जास्त दिसत असली तरी ह्या गर्दीत केवळ हताश ( अनस्किल्ड म्हणणं योग्य ) अशा तरुणांचा भरणा आहे, ज्यांना केवळ ०९ ते ०५ पर्यंत सरकारी नोकरी पाहिजे ( जिथे काम कमी मनोरंजन जास्त असतं ) अशा बेरोजगारांची गर्दी प्रचंड आहे, आणि अशा गर्दीच्या जोरावर निवडणुकीत विजय मिळत नाही, ह्याची पुरेपूर जाणीव काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेते मंडळींना आहेच।।
काॅंग्रेसचा निवडणूक इतिहास सर्व ज्ञात आहे, ज्या पद्धतीने सुभाष चंद्र बोसचा विरोध केला गेला, सरदार वल्लभभाई पटेलांना महात्मा म्हणवून घेणाऱ्या मोहनदास गांधीने बाजूला सारले, आणि एकही मत नसताना जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान पद देण्यात आले, तद्नंतर इंडिकेट-सिंडीकेट ची लढाई करुन इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या, त्यानंतर त्यांच्या मृत्युनंतर सहानुभूती ची लाट घेऊन राजीव गांधी निवडून आले, आणि राजीव गांधींच्या मृत्यवर आजवर काॅंग्रेस ने केवळ सत्ता हस्तगत केलीच ।।
आता मात्र राहुल गांधी नावाचं काहीच कतृत्व काॅंग्रेसकडे नसल्याने सत्ता प्राप्त करण्यासाठी काॅंग्रेसकडे एकमेव पर्याय म्हणजे गांधी घराण्यातील कर्त्याचा मृत्यु, जेणेकरून सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन काॅंग्रेस पुन्हा सत्तेत येण्याच्या कामावर नक्कीच असेल, बलिदान शब्दांना केवळ गांधी घराण्यातील मजूर आजही समजले जाते, परंतु केवळ पक्षापुरतेच ।। ✔️
दरवेळी शासकीय यंत्रणेविरूद्ध बोंबाबोंब करणे, प्रत्यक्ष सीमेवर असणाऱ्या जवानांना बलात्कारी म्हणण्यापासून ते देशाच्या संप्रभुतेवर केवळ टिका करुन सत्त मिळण्यास पक्षाला अडचणीचे आहे ! मोदी विरोध करता करता कॉंग्रेस कधी देशविरोधी झाली कळलं नाही 🇮🇳 ❌
सहानुभूति कशी घेतात ह्याचं ताजं उदाहरण पश्चिम बंगाल मध्ये आपण पाहिलं आहे ! अगदी मतमोजणीच्या आदल्या दिवशी पर्यंत पाय हातात घेऊन फिरणाऱ्या ममता बॅनर्जी दुसऱ्याच दिवशी दुपारी कशा ठणठणीत होत्या ते पाहिलंय जनतेने 🕵️
आज सुप्रीम कोर्टाने राजीव गांधी ह्यांच्या मारेकऱ्यांना मुक्त केले, ह्या विषयावर कॉंग्रेस पुरेपूर राजकीय वापर करणार, आम्ही आमच्या शत्रूला सुद्धा माफ करतो तिथं मोदी क्या चीज है, म्हणत कॉंग्रेस मोठमोठे कॅंम्पैन करणार हे मात्र खरं 💯
आता केंद्र सरकारने सोनिया गांधींची सुरक्षा वाढविणे गरजेचे आहे, परंतु इथे सुद्धा जर अशीच घटना घडली तरी, आरोपीच्या पिंजऱ्यात केंद्र सरकारच येऊ शकते, हेही समजूतदार जनता जाणून असेल का हा ही विचार करणे गरजेचे आहे !
मुख्य संपादक
विशेषाधिकार राखीव
जाहिरात करण्यासाठी इथे क्लिक करा
आता दैनिक डिजिटल च्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर वर
पत्रकार बनायचंय तर मग क्लिक करा