सुशिक्षित बेरोजगारी शून्य ?

कोण म्हणतं बेरोजगारी आहे ? 
देशात सुशिक्षित बेरोजगारी शून्य
पुणे: आपला दैनिक डिजिटल वार्ताहर
      आजकाल आपण अनेक राजकीय भांडणं पाहतोय, की देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे म्हणून! पण हे कितपत सत्य आहे ? चला ह्या लेखातून जाणून घेऊया ✍️

दररोज कोट्यवधींचे रिचार्ज मारले📱 जात आहेत, दररोज अब्जावधी रुपयांची खरेदी होत💥✨आहे, मग महागाई कुठे आहे? आणि आता बेरोजगारी वर बोलू 

फेसबुक पोस्टवर एखादा नोकरीचा संदेश येतो आणि तिथेच अगदी जहागीरदार असल्यासारखं एखादी व्यक्ती तिथेच कमेंट करते ⏭प्लीज डिटेल्स, इंटरेस्टेड, डिटेल्स प्लिज🙄  हे सुशिक्षित असतील का की ? आणि जर अशिक्षित आहेत  तर त्यांना रोजगार कोण देणार आणि जर सुशिक्षित असतील तर तिथेच कमेंट करण्याऐवजी दिलेल्या पोस्टचा विचार करून त्यांच्याशी थेट संपर्क साधून मुलाखतीसाठी का जात नाहीत मग बेरोजगारीचा तुणतुण का वाजवलं जातं ?
आता ह्या पोस्टमध्ये पहा एकाने सांगितलंय घरबसल्या दररोज एक हजार ते बाराशे रुपये कमवा जवळपास अवघ्या तासाभरामध्ये 500 पेक्षा जास्त लोकांनी कमेंट केलेले आहेत कमेंट्स अशा आहेत होय इंटरेस्टेड मला हवाय डिटेल्स प्लीज⏭ ही सुशिक्षित बेरोजगारांची लक्षणे आहेत काय की अशिक्षित मूर्खांची आपणच ठरवा ?
ही आणखी एक पोस्ट यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की एक व्यवसायाची फ्रेंचाईजी आम्ही देतोय आम्हाला संपर्क करा📞 खिशामध्ये नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा व्यक्तींची संख्या प्रचंड वाढलेली आहे जर तुमच्या खिशामध्ये पैसे आहे तर त्यांना थेट संपर्क करा इथे घरी बसून बेडवर पडल्या पडल्या संदेश काय टाकता ही सुशिक्षित मूर्खांचीच लक्षण आहेत💯 अशांना नोकरी, व्यवसाय कोण देणार ?🤔
आता हे महाशय व्हाट्सअप वरती एका एच आर सोबत चॅट करत आहेत आणि विचारत आहेत इंटरव्यू कुठे होणार साहेबांनी सांगितलं की इंटरव्यू मुंबईमध्ये आहे तर हे मोठे साहेब? (ज्यांना जॉब हवा आहे) ते विचारत आहेत इथे पुण्यातच होणार नाही काय म्हणजे यांच्यासाठी कंपनीने विशेष आयोजन करावे का  यांना नेण्यासाठी आणण्यासाठी व्यवस्थितपणे एखादी लक्झरी बस बुक करून ठेवावी किंवा एखादी ओला बुक करून घ्यावी इतके हे महाशय सुशिक्षित आहेत! इतके सुशिक्षित आहेत की प्रत्यक्ष पंतप्रधानांनीच त्यांचा इंटरव्यू घ्यायला यावा असं यांना वाटतंय, असं दिसतंय 🤔
आता हे साहेब पहा यांनी एका नामांकित वर्तमानपत्र समूहात काम केले आहे, दिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की इथे कमेंट करू नये आणि या साहेबांना हे कळतच नाही 🕵️हे सुशिक्षित मूर्ख नसतील काय ?
मग आता बोला, देशात सुशिक्षित बेरोजगारी किती आहे ?
दररोज लक्षावधी नोकऱ्यांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते, मग बेरोजगारी कशी?
हातात जे तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर करायला शिका! 
साधं उत्तर आहे, तरुणांकडे प्रमाणपत्र आहे, पण बुद्धिमत्ता कुठे वापरायची हेच कळत नाही, मग उद्योजक काय करणार? 
बघा शिका 🕵️ समोर काय लिहिलंय त्याचा विचार करायला शिका आणि मग प्रत्युत्तर द्या, नुसतंच प्रमाणपत्र घेऊन मिरवू नका, स्वतःमधील कौशल्य सुद्धा दाखवायला शिका, मग तुम्ही १००% स्वावलंबी आणि देश समृद्ध बनेल 💯
- साभार एम एम मॅनेजमेंट पुणे 

Popular posts from this blog

Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

श्श...! 'हे' Android ऍप गुपचूप चोरत आहेत तुमचा डेटा, लगेच करा डिलीट!!!!!!;

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!